Sunday, 17 October 2021

बेधुंद



जीवन जगता जगता खूप काही शिकले
कसे जाणावे नात्यांना हे अनुभवाने उमजले
स्वतःभोवती मी कुंपण नात्यांचे घातले
अन् बंधनात स्वतःच स्वतःला बांधले
अन् स्वातंत्र्याचे पंख माझे मीच छाटले
दुःख मनीचे ते खोल हृदयी साठवले
अमाप सोसले  कष्ट, नाही जगण्यास ते इष्ट
होऊनी बंधनातूनी मुक्त,विसरुनी सारे बंध
जगायचे आहे मला बेधुंद
अन् जीवनी फुलवावयाचा आहे  आनंद ......

सौ. राजश्री सुहास जाधव. ( काल्पनिक रचना )


4 comments:

  1. अतिशय सुरेख रचना केली सखी ✍️🌟👌👌👌

    ReplyDelete
  2. खूप खूप मस्त रचना अप्रतिम....mam..👌👌🌿🌿🌹🌹🌹🌺🌺

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...