Sunday, 3 October 2021

अनामिक नाते

 


 

शोधून पाहिले होते, 
ते मला गवसले होते
ते अनामिक नाते
माझे माझ्या मनाशी होते
सैरभैर होणाऱ्या मनाला
माझ्या थोपवित होते
अन् सहज, सुंदर
भावनांना फुलवित होते
लेखणीतुनी माझ्या ते
हळुवार, पानावर उमटत होते
नाते माझे माझ्या मनाशी
ते आणखीन दृढ होत होते 
अनामिक ते नाते
स्रोत जणू प्रेरणेचा होते
कुपीत हृदयाच्या मी
जपुनी ठेवले होते 

सौ. राजश्री सुहास जाधव.


8 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...