Wednesday, 27 October 2021

मर्जी

सर्वांची घरात सांभाळताना मर्जी

त्रेधातिरपीट उडते माझी

गोंधळून जाऊनी कामे करती घाई घाई

मग कामात अचुकता ती कशी येई

सारे म्हणती मग करतेस कामात दिरंगाई

काहीच तुला तर येत नाही

जोडुनी हात सर्वांना करते मी अर्जी

येते मला सारे काही पण

त्रेधातिरपीट उडते माझी

सांभाळताना तुमची मर्जी

सौ. राजश्री सुहास जाधव.


7 comments:

  1. खरंय मॅडम...गृहिणींची घरदार सांभाळताना होणारी धावपळ सुंदर शब्दांत वर्णन केली...!✍️👌👌👌

    ReplyDelete
  2. गृहीणीची व्यथा/ स्त्रीची व्यथा सुरेख शब्दांत मांडली...👌👍💐🍫

    ReplyDelete
  3. व्वा व्वा सखी अगदी मनातलं बोललीस गं ✍️👌👌👌

    ReplyDelete
  4. खूपच छान लिहिलंय अप्रतिम रचना केली
    हीच परिस्थिती असते सगळीकडे

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...