देऊनी जन्म मजला तू 🌺
जग हे मज दाविले 🌺
तळहाताचा करुनी पाळणा 🌺
आजन्म मला तू सांभाळले 🌺
गाऊनी अंगाई मजसाठी तू 🌺
कुशीत तुझ्या निजवले 🌺
सांगुनी कथा शूरवीरांच्या 🌺
तूच मजला घडवले 🌺
स्वतः दुःख सोसुनी🌺
सुखात मजला ठेविले 🌺
थोर तुझे उपकार आई 🌺
तुझ्या ऋणाची कशी करू मी उतराई 🌺
आवडेल मज तुझ्या ऋणात राहण्या निरंतर आई.....🌺🌺
सौ. राजश्री सुहास जाधव.
अप्रतिम... आईची महती ,वर्णावी किती,शब्दही ते, अपूरे पडती👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखुप छान राजश्री 👌🏻👌🏻आई हा एक साधा सोपा शब्द पण किती माया दडली आहे या शब्दामागे...... एक संपूर्ण जगच आहे आईमध्ये..... जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्या देवाचे रूप आहे..... लहानपणापासून आंजारून गोंजारून लाडाने खायला प्यायला देणारी आई प्रत्यक्ष अन्नपूर्णा देवी असते..... आजारी पडल्यावर एखाद्या डॉक्टर आणि नर्स दोन्ही होते....... रात्र रात्रभर जागून आपली सेवा करते..... कधी माया करते, कधी रागावते परंतु नेहमी निस्वार्थपणे फक्त आपल्याच भल्याचा विचार करते.......
ReplyDelete🌹🙏🏻
खूप छान 👌🏻👌🏻 आई थोर तुझे उपकार🙏🏻🙏🏻
ReplyDeleteआकाशाएव्हढं प्रेम करणारा ईश्वर म्हणजे आई
ReplyDeleteमॅडम, सुंदर अंगाई गीत रचिले...!✍️👌👌👌
ReplyDeleteआत्मा आणि ईश्वर मिळून आई होत....देवाचं दुसररू आई... सुंदर शब्द रचना..👌👍✍️🍫
ReplyDeleteवाहह...मातृप्रेमाने ओतप्रोत भरलेली रचना...खरचं आईच ऋण फेडणं अशक्यचं....आईची माया शब्दबद्ध करणही तस अवघडच...पण सखी आपण छान शब्दबद्ध केलय आईच प्रेम...👌👍💐🍫
ReplyDelete🙏मातृदेवो भव:🙏
Thanks to all my friends 🙏
ReplyDeleteमातृप्रेमाने ओतप्रोत अशी रचना सखी
ReplyDeleteअप्रतिम शब्दांनी सजलेली आईविषयीच्या प्रेमाची महती
ReplyDeleteखुप सुंदर
Atishay sunder rachna 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर आई वर कविता केलीत...👌👌👌
ReplyDelete