नमस्कार🙏
आज ज्या पाककृती बद्दल सांगणार आहे,ती नक्कीच सर्वांना आवडेल. मुले बीट,कोबीची भाजी खायची म्हटलं की कंटाळा करतात. पण ह्या भाज्याही खाणे खूप महत्त्वाचे आहे.अशा वेळेस आपण त्या वेगळ्या पद्धतीने केल्या तर सर्वानाच आवडू शकतात. चला तर मग, आज आपण अशीच एक पाक कृती पाहू.......
बीटाच्या पुऱ्या/ पराठे
साहित्य : २ मध्यम आकाराचे बीट, १कच्चा बटाटा, थोडा कोबी आपल्या आवडीनुसार, गव्हाचे पीठ,बेसन पीठ, मैदा, आले, लसूण, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, एक छोटी वाटी दही, चाट मसाला, धने पूड, जिरे पूड, मीठ, कोथिंबीर, तेल.
कृती :- प्रथम बीट स्वच्छ धुवून किसून घेणे. त्याचप्रमाणे थोडा कोबी, कच्चा बटाटा दोन्हीही किसून घेणे. किसलेल्या बीटाचे पाणी फेकून न देता ते बाजूला ठेवणे. कोबी व बटाटा किसातील पाणी काढून टाकावे. नंतर या मिश्रणामध्ये गव्हाचे पीठ (इतर दोन्ही पिठांपेक्षा जास्त), थोडे बेसन थोडा मैदा घालावा. या सर्व मिश्रणामध्ये
१ चमचा जिरे, धने पूड, आले लसूण पेस्ट, ५ ते ६ हिरवी मिर्ची पेस्ट (तिखट आवडत असेल तर जास्तही घेऊ शकता), बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला १ चमचा, एक छोटी वाटी दही, मीठ चवीनुसार, एक मोठा चमचा गरम तेल घालणे. सर्व मिश्रण एकजीव करून त्याची कणीक मळणे, पण मळताना पाणी अजिबात
घालू नये, त्या ऐवजी आधी काढलेले बीटाचे पाणी लागेल तसे घालून शक्यतो घट्ट मळणे, कारण बीट, बटाटा, कोबी ह्यांस पाणी सुटते. नंतर ५ ते १० मिनिटांनंतर पुऱ्या लाटून, कढईत तेल गरम झाले की तळणे. झाल्या गरमागरम पुऱ्या तयार.
ह्याच पिठाचे आपण पराठे ही बनवू शकता.
दही किंवा सॉस सोबतही छान लागतात.
सौ. राजश्री सुहास जाधव.
व्वा..सुंदर रेसीपी 👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर
ReplyDeleteव्वा खूप छान रेसिपी सांगीतली की नक्की ट्राय करेन
ReplyDeleteरेसीपी... सुंदर शब्दांत वर्णन!✍️������
ReplyDeleteवाहहह... खुप छान...👌👍💐🍫
ReplyDelete