चिऊ, काऊ, राघू, मैना
पारवा अन् कोकिळ
रंगली साऱ्या पक्ष्यांची
एकदा सुरेल मैफिल
गाण्यासाठी सारे
झाले होते सामील
देऊनी कोकिळेस पहिला मान
सुरुवात झाली मैफिलीची छान
घेतली कोकिळेने सुंदर तान
गाऊ लागली कोकिळा कुहू कूहू
संगतीने तिच्या राघू-मैनाही लागले गाऊ
आपणही त्यांच्यासवे सुरेल गीत गाऊ
वाटे त्या चिऊ, म्हणुनी करू लागली चिवचिव
न जमले गाण्याचे सूर,
म्हणुनी साऱ्यांना येई चिऊची कीव
थांबवुनी त्या चिऊस,
गाऊ लागला पारवा गुटूर गू गुटूर गू ...
थांबवुनी त्यास म्हणाला काऊ,
तुझ्यासवे मीही गातो रे भाऊ
अन् कर्कश कावकाव करू लागला काऊ
रंगलेल्या मैफिलीचा बेरंग करुनी
गालातल्या गाली हसू लागला काऊ
न आवडूनी वागणे काऊचे
घेतली कट्टी साऱ्यांनी काऊशी
अन् रंगलेल्या मैफिलीस
दिली सुट्टी त्या दिवशी .........
सौ. राजश्री सुहास जाधव.
खुपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteव्वा..सुंदर च मैफिल ..अतिशय सुंदर रचना
ReplyDeleteखुप....खुप छान रचना 👌👌
ReplyDeleteअगदी सकाळचे प्रसन्न वातावरण डोळ्यासमोर उभे राहिले
ReplyDeleteसुंदर वर्णन...!✍️👌👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर..👌👌👍
ReplyDeleteसुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteसुंदर लिहिलंय मॅडम!✍️👌👌
ReplyDeleteKhup khup chan lihilay apratim rachna keli 👌👌👌
ReplyDeleteखुप खुप सुंदर....
ReplyDeleteखुप खुप सुंदर...
ReplyDelete