'जाऊ दे, माझ्या नशिबात जे असेल ते होईल ', असे वाक्य आपण बरेचदा बोलून जातो. काही माणसांना तर ती सवयच जडते, सरळ सारं काही नियतीवर ढकलून मोकळे होतात.
'दे हरी पलंगावरी' असे म्हणून कसे चालेल ! आपल्याला कुठलाही हरी येऊन आयते काहीच देणार नाही. त्याकरिता स्वतःचं डोकं वापरून, परिश्रम करून आपण वाटचाल केली तर आपले जीवन सुसह्य होईल.
माणसाचे जीवन ध्येय शून्य असेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. नुसतेच नशिबाला दोष देत राहणे, हे चुकीचे आहे.
माणसाला एकाच वेळेस खूप काही हवे असते. त्याला सुंदर पत्नी हवी असते, छानसं घर हवं असतं, चांगली नोकरी हवी असते, भरपूर पैसा-अडका हवा असतो, समाजात प्रतिष्ठा हवी असते. काहींना हे सारे त्यांच्या कष्टाने, कठोर मेहनतीने प्राप्त होते तर काहींना पूर्वजांच्या कृपेने प्राप्त होते. हे सर्व सुख प्राप्त झाले तरी ते चिरकाल टिकेलच असे आपण सांगू शकत नाही. म्हणून जीवन समाधानाने जगायचे असेल तर मेहनतीशिवाय
पर्याय नाही. आयुष्यात दुःख येते तेव्हाच आपल्याला सुखाची किंमत कळते. आयुष्यात टक्के टोणपे खाऊनच खरे जीवन अनुभवता येते.
माणूस पूर्णपणे कधीच संतुष्ट नसतो. त्याला अधिकाधिक हवेच असते. पण या सर्वाच्या पलीकडे जाऊनही एक सुदंर असे जग आहे, याचा विचार तो कधी करतच नाही. तुम्ही काय किंवा मी काय आपण सर्वांनी स्वतः पुरता आयुष्य मर्यादित न ठेवता, आपल्याला करण्यासारखे खूप असते.
कधी वेळ मिळाला तर अनाथाश्रमात जाऊन शक्य ती मदत अनाथांना केली तर त्यांना मिळणाऱ्या आनंदातून माणसाला समाधान मिळू शकते. प्राणी मात्रांवर माणसाला भूतदया दाखवता आली पाहिजे, निसर्गाचा ऱ्हास कसा रोखू शकता येईल, या दृष्टीने माणसाने ठोस पाऊल उचलले पाहिजे, सर्वांशी माणुसकीने वागले पाहिजे.
ह्यातील एक जरी गोष्ट आपण अंगिकारली तर स्वतः चं आयुष्य सुखाने जगण्या पलीकडेही आनंद देणारं खूप काही असतं, हे आपल्याला उमजून जाईल.
सौ. राजश्री सुहास जाधव.
खुपच सुंदर क्या बात है
ReplyDeleteसकारात्मक दृष्टिकोन असलेला अप्रतिम लेख!✍️👌👌👌
ReplyDeleteशुभ प्रभात!🙏
वाहहह खुप सुंदर , प्रेरणादायक विचार मांडले आहेत सखी...👌👍💐🍫
ReplyDeleteखूपच छान विचार 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप सुंदर लिहिलेय👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteवाहा... अतिशय सुंदर
ReplyDeleteसखी... सुंदर आणि सकारात्मक लेखन ✍️������
ReplyDeleteखूपच सुंदर लिहिलंय👌👌👌
ReplyDelete