रविवार असला तरी वेळ काही पुरत नाही 🕛
आठवड्यातील कामे काही केल्या संपता संपत नाही 🕧
साफसफाई, झाडूपोछा, धुणी- भांडी 🕐
करता करता उसंत काही मिळत नाही 🕜
सकाळ, दुपार, संध्याकाळ 🕑
बनवावे काय खाण्यास काही कळतच नाही 🕝
नको उपमा, नको पोहे 🕒
कर तू डोसा,इडली चटणी नाहीतर वडे 🕞
असते अशी मुलांची मागणी 🕓
मग कामाशी करून हात मिळवणी 🕟
पुरी करते त्यांची मागणी 🕔
आहे आज रविवार खास 🕠
तर जेवण बनव लज्जतदार 🕕
आदेश येता यजमानांचा 🕡
आखते बेत मग मिष्टान्नाचा 🕖
तृप्त होती सर्व आस्वाद घेऊनी भोजनाचा 🕢
मग करते विचार जरा वेळ लवंडण्याचा 🕗
तर फर्मान येते त्यांचे 🕣
मिळणार आहे का चहा मला?🕘
लागते पुन्हा मग तयारीला 🕤
डोंगर उपसता उपसता कामाचा 🕙
ताकद काही उरत नाही 🕥
रविवार असला तरी वेळ काही पुरत नाही 🕚
रांधा वाढा उष्टी काढा 🕦
करता करता कसा पळाला वेळ ⏱️
हे कधीच मला उमजत नाही...⏲️
सौ. राजश्री सुहास जाधव.
अप्रतिम सुंदर
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम
ReplyDeleteहो ना रवीवारीच जास्त काम असत... छान लीहीलय सखी...👌👍💐🍫
ReplyDeleteअप्रतिमच 👌👌👌
ReplyDeleteमस्त आहे ������
ReplyDeleteसुंदर कविता!✍️👌👌👌
ReplyDeleteअगदी 💯 टक्के बरोबर लिहिले सखी ✍️🌟👌
ReplyDeleteखूप छान प्रत्येक गृहीणीचे अनुभवाचे बोल
ReplyDelete