सोपं असतं का आठवणींना हद्दपार करणं ?
जसं अवघड असतं श्वासाविना जगणं
आपुल्यासवे राहतात निरंतर त्या आठवणी
येता सय तयांची , जाते रमुनी तयात मी
डोहात आनंदाच्या तरंगते मी
आठवणींसवे जगते मी
मग का करावी तयाची पाठवणी ?
अवचित हुरहूर दाटते मनी
छळतात कधी कधी या आठवणी
परी हृदयात केली मी तयांची साठवणी
करणार नाही हद्दपार आठवणींना कधीच मी......
सौ. राजश्री सुहास जाधव.
खुपच सुंदर 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद मॅडम 🙏
ReplyDeleteबहोत खूब... अप्रतिम!✍️👌👌👌
ReplyDeleteखूप च सुंदर...
ReplyDeleteखूपच सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteखूपच सुंदर 👌
ReplyDelete