Tuesday, 12 October 2021

परी



होती एक परी
नाव तिचे शर्वरी
आवडे मुलांना ती भारी
जाई घेऊनी मुलांना जादुई नगरी
जादुई नगरीत होते इवलेसे दोन ठेंगू
नाव होते त्यांचे गंपू नि झंपू
गंपूकडे होता जादुई पावा
वाजविता तो, मंत्रमुग्ध होऊनी
मुले घेती त्याच्याकडे धावा
झंपूकडे होती जादुई चादर
बसवुनी मुलांना त्यावरी,
करती ते जादुई नगरीची सफर
जादुई नगरीत होते सारेच आगळे
पाहुनी ती जादुगरी अचंबित होती सगळे
जादुई नगरीत त्या रस्ते होते वर
अन् आकाश होते खाली
सूर्य होता रुपेरी अन् चंद्र तो सोनेरी
आकाशाच्या अंगणात विखुरल्या
चांदण्या त्या सोनेरी
रस्त्यावरच्या झाडांना चॉकलेट,
गोळ्या अन् बिस्किटांची फुले
घेण्यासाठी धडपडत होती मुले
फिरवुनी जादुई छडी
मग देई परी मुलांना खाऊची पुडी 
अशा तऱ्हेने मुलांना लागली
जादुई दुनियेची गोडी
जादुई नगरीची गंमत जंमत न्यारी
तुम्हीही करा एकदा, या दुनियेची सफारी......

सौ. राजश्री सुहास जाधव


11 comments:

  1. वाहहह..खुपच सुंदर जादुई दुनिया....��������

    ReplyDelete
  2. वाहा...खुपच सुंदर रचना केलीत जादूई नगरीचे..

    ReplyDelete
  3. सुंदरच.... जादुई नगरीची सफर 👌👌

    ReplyDelete
  4. सुंदर रचना केली सखी ✍️��

    ReplyDelete
  5. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना केली

    ReplyDelete
  6. अप्रतिमच 👌👌👌👌

    ReplyDelete
  7. अप्रतिम रचना👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  8. खूप गोड रचना 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  9. अप्रतिमच रचना केलीत👌👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...