Sunday, 10 October 2021

भाव कळेल का कोणास !



वैश्विक महामारीने घात साऱ्यांचा केला
शिक्षक आणिक विद्यार्थीही
त्यात होरपळून गेला
विद्यार्थ्यांविना ओस पडली शाळा
अन् ऑनलाईन शिक्षणाचा
प्रघात सुरू झाला
परी शिक्षणाला त्या मर्यादा आल्या
कसे परवडेल ऑनलाईन शिक्षण
एखाद्या गरीबाला ?....
ज्यासी भ्रांत पडे पोटापाण्याची
येणाऱ्या नित्य दिनाला
विद्यार्थी अन् शिक्षकांतील
संवाद तो विरला
विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा
विकास  सारा खुंटला
करावा लागतो ऑनलाईन शिक्षणासाठी
पालकांचा पाठपुरावा
वाढला आहे विद्यार्थी
अन् शिक्षकांतील दुरावा
आजमितीला पर्याय नाही
ऑनलाईन शिक्षणाला
परी प्रत्यक्ष शिकवण्याची
सर नाही येणार त्याला
दोघांतील भाव कळेल का कोणा ?
घाव असे हा जीवघेणा.....

सौ. राजश्री सुहास जाधव.


10 comments:

  1. अगदी बरोबर लिहीलयस 👌👌

    ReplyDelete
  2. हो ना ....खूप छान रचना..👌✍️🍫👍

    ReplyDelete
  3. छानच लिहिले 👌👌👌

    ReplyDelete
  4. अगदी वास्तवदर्शी काव्यरचना केली सखी ✍️��

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर च 👌👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  6. सुंदर आणि वैचारिक काव्य!✍️👌👌👌

    ReplyDelete
  7. अगदी बरोबर खूप छान लिहिलंय 👌👌👌

    ReplyDelete
  8. अगदी बरोबर
    खूपच सुंदर 👌👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...