Wednesday, 29 September 2021

मनातलं माझ्या......



मनातलं माझ्या ओळखत नाही..

दावित असलीस जरी..

मी जाणले आहे...

माझेच नाव कोरले आहे तुझ्या हृदयावरी...

हृदयी तुझ्या मिळवूनी स्थान...

झालो मी बेभान...

मान्य करशील तू ही...

विसरून जाशील भान...

सांगशील गुज मनीचे...

ह्या हृदयीचे, त्या हृदयात...

देशील ग्वाही तुझ्या प्रितीची...

अन् मनातलं माझ्या ओळखल्याची ....

सौ. राजश्री सुहास जाधव.


6 comments:

  1. खूपच सुंदर अप्रतिम शब्द रचना आहे

    ReplyDelete
  2. वाहा वाहा अतिशय सुंदर रचना...

    ReplyDelete
  3. वाहहह खुप सुंदर , ह्रदयस्पर्शी रचना...👌👍💐🍫

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...