कठीण असं काहीच नसतं
ठरवलं तर सहज, सोपं असतं
विश्वास असता स्वतःवर
सहज साध्य होत जातं ||
इवल्याशा त्या पाखरास
गगन भरारी घेण्यास
पंखात बळ साठवावं लागतं
कठीण असं काहीच नसतं....
काळोखातही अस्तित्व आपले टिकविण्यास
काजव्यास त्या स्वयंप्रकाशित व्हावं लागतं
कठीण असं काहीच नसतं....
स्त्री-पुरुष भेदभावात अडकलेल्या नारीस
खंबीर होऊन लढावंच लागतं
कठीण असं काहीच नसतं....
वाट चुकलेल्या लेकराला सन्मार्गी लावण्यास
मातेला प्रसंगी कठोर व्हावंच लागतं
कठीण असं काहीच नसतं....
ठरवलं तर सहज, सोपं असतं
विश्वास असता स्वतःवर
सहज साध्य होत जातं ||
सौ. राजश्री सुहास जाधव.

खुप छान रचना 👌🏼👌🏼
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼
अतिशय सुंदर रचना 👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद मॅडम 🙏
Deleteअप्रतिम सुंदर लिखाण, सुंदर कविता,सुप्रभात 🙏🙏🙏🔥
ReplyDeleteखूपच सुंदर रचना केली आहे 👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद सर 🙏
Deleteसुंदर रचना डियर....👌👍✍️🍫
ReplyDeleteधन्यवाद सखी🙏🌹
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteRajashri Jadhav awesome,khup chan👌
ReplyDelete