Sunday, 19 September 2021

कठीण असं काहीच नसतं...



कठीण असं काहीच नसतं
ठरवलं तर सहज, सोपं असतं
विश्वास असता स्वतःवर
सहज साध्य होत जातं ||

इवल्याशा त्या पाखरास
गगन भरारी घेण्यास
पंखात बळ साठवावं लागतं
कठीण असं काहीच नसतं....

काळोखातही अस्तित्व आपले टिकविण्यास
काजव्यास त्या स्वयंप्रकाशित व्हावं लागतं
कठीण असं काहीच नसतं....

स्त्री-पुरुष भेदभावात अडकलेल्या नारीस
खंबीर होऊन लढावंच लागतं
कठीण असं काहीच नसतं....

वाट चुकलेल्या लेकराला सन्मार्गी लावण्यास
मातेला प्रसंगी कठोर व्हावंच लागतं
कठीण असं काहीच नसतं....

ठरवलं तर सहज, सोपं असतं
विश्वास असता स्वतःवर
सहज साध्य होत जातं ||

सौ. राजश्री सुहास जाधव.


10 comments:

  1. खुप छान रचना 👌🏼👌🏼

    गणेश दळवी 🙏🏼

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. अप्रतिम सुंदर लिखाण, सुंदर कविता,सुप्रभात 🙏🙏🙏🔥

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर रचना केली आहे 👌👌👌👌

    ReplyDelete
  5. सुंदर रचना डियर....👌👍✍️🍫

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...