सत्ता, संपत्तीच्या हव्यासापायी
मनुष्य रचतो कूटनीति
त्यातुनी नाना समस्या त्या उद्भवती
स्वार्थापोटी त्यांच्या, निरपराध ते होरपळती
शोषण करूनी त्यांचे, गाजवू पाहतो
साऱ्या सृष्टीवर जणू त्याचाच अधिकार
पण नसे टिकणारे हे चिरकाल
माणसाला करण्यास माणूस
विधात्यालाच बदलावी लागली कूस
मग महामारी, महापूर, महागाई,
भूकंप एकामागुनी एक
संकटाचा घातला तू धुडगूस
पुरती फिटली माणसाची हौस
हे विधात्या, घेऊन जा हे सारे
तुझे उदात्त आणिक दातृत्वाचे
गुण आम्हा सकलांस तू दे रे .......
सौ. राजश्री सुहास जाधव.

अप्रतिम सुंदर
ReplyDeleteअतिशय सुंदर...
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम 👌👌👌
ReplyDeleteवास्तविकता दर्शवणारी रचना 😌🙏
ReplyDeleteVastav aaheaa hea sundar rachna..👌👍✍️🍫
ReplyDeleteअप्रतिम खूप खूप सुंदर लिहिलंय👌👌👌👌
ReplyDeleteखूप खूप सुंदर रचना केली सखी!👌👌👌
ReplyDeleteखूप खूप खूप खूप सुंदर सुरेख आणि अतिशय अप्रतिम अशी रचना केलीत राजश्रीताई 👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐⭐✍️✍️✍️✍️✍️💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🤗
ReplyDeleteअप्रतिम रचना 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDelete