Tuesday, 28 September 2021

आर्त साद



सत्ता, संपत्तीच्या हव्यासापायी
मनुष्य रचतो कूटनीति
त्यातुनी नाना समस्या त्या उद्भवती
स्वार्थापोटी  त्यांच्या, निरपराध ते होरपळती
शोषण करूनी त्यांचे, गाजवू पाहतो
साऱ्या सृष्टीवर जणू त्याचाच अधिकार
पण नसे टिकणारे हे चिरकाल
माणसाला करण्यास माणूस
विधात्यालाच बदलावी लागली कूस
मग महामारी, महापूर, महागाई,
भूकंप एकामागुनी एक
संकटाचा घातला तू धुडगूस
पुरती फिटली माणसाची हौस
हे विधात्या, घेऊन जा हे सारे
तुझे उदात्त आणिक दातृत्वाचे
गुण आम्हा सकलांस तू दे रे .......

सौ. राजश्री सुहास जाधव.


9 comments:

  1. खूप छान लिहिलंय अप्रतिम 👌👌👌

    ReplyDelete
  2. वास्तविकता दर्शवणारी रचना 😌🙏

    ReplyDelete
  3. Vastav aaheaa hea sundar rachna..👌👍✍️🍫

    ReplyDelete
  4. अप्रतिम खूप खूप सुंदर लिहिलंय👌👌👌👌

    ReplyDelete
  5. खूप खूप सुंदर रचना केली सखी!👌👌👌

    ReplyDelete
  6. खूप खूप खूप खूप सुंदर सुरेख आणि अतिशय अप्रतिम अशी रचना केलीत राजश्रीताई 👌👌👌👌👌⭐⭐⭐⭐⭐⭐✍️✍️✍️✍️✍️💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🤗

    ReplyDelete
  7. अप्रतिम रचना 👌👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...