Thursday, 16 September 2021

स्किल

       




🌹स्किल🌹 
      
सगळ्यांना सगळं येतं
असं कधी होत नसतं;
पण ज्याला जे येतं ते
खूप छान असतं.
कारण ते ज्याचं त्याचं स्कील असतं.
कोषातच गुरफटून न राहता
सुरवंटाचं फुलपाखरू होतं
हे त्याचं स्कील असतं.
विद्रूप असले जरी पाय
मयुरासम पिसारा फुलवून
नृत्य करणे जमेल काय?
कारण हे त्याचं स्कील असतं.
मातीतून सोनं पिकवणं
हे बळीराजाचं स्कील असतं.
कर्ता करविता तो ईश्वर
कधी, कुठं, कसं, काय, कोणास निर्माण करावं
हे त्याचं स्कील असतं.
आणि दाद कशी, कधी, कुठे, कोणास द्यावी
हे ज्याचं त्याचं स्कील असतं.
सगळ्यांना सगळंच येतं
असं कधी होत नसतं
पण ज्याला जे येतं
ते खूप छान असतं
खूप छान असतं.
                  राजश्री....✍️

8 comments:

  1. नमस्कार राजश्री जीऽ ...🙏
    कविता " Skills" खूपच छान केली आहे अप्रतिमच शब्द आणि शब्दांकन ...👌
    तुमचा blog खूप छान झालाय 👌
    Blogger उपक्रमास खूप खूप हार्दिक शुभेच्छा
    And Congratulations!!
    आबा ....🙏🍫

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आबा 🙏, तुमचा आशीर्वाद असाच पाठीशी असू दे.

      Delete
  2. राजश्री खूप खूप छान 👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. राजश्री मॅम ब्लाॅग खुप छान तयार झाला,कविता पण छान आहे. अभिनंदन, आता छान लिहा🙏🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  4. अप्रतिम रचना 👌🏼👌🏼
    गणेश दळवी 🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  5. वाहा... अतिशय सुंदर व सुरेख रचना केलीत.
    देवेंद्र... प्रेम कवी💐💐💐🙏🙏🙏

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...