एकदा चंद्रावरी रुसली चांदणी
दाटुनी अश्रू ते लोचनी,
म्हणाली," माझ्या परी आहे का कोणी देखणी?"
चंद्र म्हणाला," नको दाटूस अश्रू ते नयनी,
मी चंद्र तू माझी चांदणी,
तुझ्याच रंगात रंगलो मी,
तू नभीची चमचमती चांदणी
रूप तुझे साऱ्यांना भुलविती
अन् कित्येकांसी काव्य ते स्फुरती
तुझ्याविना असे अपुरा मी
तूच गं माझी साजणी
आहेस तू देखणी 🌠🌠🌠🌠
सौ . राजश्री सुहास जाधव.

खूप खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद ताई🙏
ReplyDeleteव्वाव... अप्रतिम शब्दगुंफण मॅडम!👌👌👌
ReplyDeleteव्वाऽ ...!
ReplyDeleteखूपच छान अप्रतिमच👌
खूप खूप शुभेच्छा 🌹
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आबा🙏