Sunday, 19 September 2021

लिहायचं होतं बरंच काही.....


लिहायचं होतं  बरंच काही....

पण शब्द मजला सुचले नाही....

शब्दांचा उडे गोंधळ....

भावनांची होई सरमिसळ ...

काय लिहावे, काय पुसावे ...

सहज,सुंदर की, ढोबळ ....

लिहायचं होतं बरंच काही ....

पण शब्द मजला सुचले नाही ....

भावनांना जोडुनी शब्दांची धार ....

शब्द देती लिहिण्यास आधार ....

कथा, कादंबरी अन् कविता ....

विषय असती हजार ....

परि जमेल का मजला ...

प्रश्न पडले फार ....

लिहायचं होतं बरंच काही ....

पण शब्द मजला सुचले नाही ....

सौ. राजश्री सुहास जाधव.


4 comments:

  1. खूप छान लिहिलंय ताई अप्रतिम रचना केली 👌👌👌👌👌

    ReplyDelete
  2. खुप छान लिहीलयस 👌🏼👌🏼

    गणेश दळवी 🙏🏼

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...