सहज एकदा मनात मी डोकावले
अन माझ्याच मला पाहुनी भयभीत झाले
तिरस्कारांचे, सूड भावनेचे व अहंभावनेचे
रूप पाहुनी अवसान सारे गळाले
इच्छा-आकांक्षांचे विणूनी जाळे
संघर्षमय जीवनास माझिया मीच कवटाळले
अन् मुखवटे सुखाचे माझे नकळत गळून पडले
जीवनात मिळविण्या प्रेम, वात्सल्य, आपुलकी
शरण गेले मी प्रभूचरणी
पराकाष्ठेने इंद्रियांवरी मिळवूनी ताबा
तमोगुणांचे मळभ सारे दूर केले
न साचे मनात काही आता
सदैव राहू दे कृपादृष्टी तुझी रे भगवंता...... 🌹🌹🙏
सौ.राजश्री सुहास जाधव.

अंतरीक भावनाचे मुख्य दर्शन म्हणतात याला व
ReplyDeleteज्याला हे कळाले तोच कृपा दृष्टी पात्र होतो.
अतिशय सुंदर रचना केलीत....
👌👌👌👌💐💐💐💐💐
प्रेम कवी....✍️
अंतरीक भावनाचे मुख्य दर्शन म्हणतात याला व
ReplyDeleteज्याला हे कळाले तोच कृपा दृष्टी पात्र होतो.
अतिशय सुंदर रचना केलीत
प्रेम कवी....✍️
सुंदर लेखन केले ✍️������
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम mam....🌹👌👌👌👌🌺🌺
ReplyDeleteKhup chaan.👌👍✍️🌹🍫
ReplyDeleteमस्तच लिहिलंस राजश्री 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखुप सुंदर लिहीलीस कविता👌👌
ReplyDelete