Tuesday, 28 September 2021

छत्री



आहे ती एक छत्री
काय सांगू तिची महती !
नाते तिचे अन् आपुले
पुरातन काळापासुनी चालत आले
नानाविध रूप,रंगात ती अवतरते
सुंदर ते रूप साऱ्यांना मोहवते
सानांपासुनी ते थोरांपर्यंत
अन् निर्धनांपासुनी, धनिकांपर्यंत
साऱ्यांच्याच उपयोगी ती पडते
ऊन, पाऊस, वाऱ्यापासुनी
साऱ्यांचे ती रक्षण करते
छत्रीचे ते आवरण,
मज वाटे जणू
कुटुंब प्रमुख यजमान
ठेविती सर्वांस एकसंध जोडून
तार एक जरी निखळता,
समतोल जाई छत्रीचा बिघडून
त्यासम कुटुंबातील व्यक्तीचे गैरवर्तन
बिघडवून टाकती कुटुंबाचे संतुलन
दांडा छत्रीचा म्हणजे
भरभक्कम पाया कुटुंबाचा
एकसंध जोडणारा
धागा तो विश्वासाचा
टोक छत्रीचे भासे मज
शिखर ते सहनशीलतेचे
संकटे अमाप झेलुनी
शाबूत राहते ती नेटाने
रया जाता छत्रीची
दाविली जाते मग
वाट तिला अडगळीची
त्यासम येता वृद्धत्व
वागणूक मिळे उपेक्षेची
सारखीच होई अवस्था ती
छत्रीची अन् माणसाची ...

सौ. राजश्री सुहास जाधव.


6 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...