कधी कधी विचारांचं माझ्या माजतं काहूर
मग उगाचच वाटे , अनामिक ती हुरहूर
राहू शकेल का मी आपल्यांपासुनी दूर ?
दाटेल का त्यांच्या हृदयी आठवांचे पूर ?
माझ्याविना वाटेल का तयांना, जीवन क्षणभंगुर?
त्याकरिता पाहते मी अलिप्त राहून,
मग जाईल मला सारे उमजून......
सौ. राजश्री सुहास जाधव.

वाह खुप सुंदर रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteखूप सुंदर रचना👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम रचनाविष्कार मॅडम!👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुरेख रचना केली सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteछान
ReplyDeleteअसा प्रयत्न करायला हवा अलिप्त राहण्याचा ....मस्त कविता👌👌
ReplyDelete