'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी '
खरेच जीवन किती क्षणभंगुर आहे ना !,
आपण कशाचीच शाश्वती देऊ शकत नाही. आज
मिळणारे सुख उद्या मिळेलच याची खात्री देता येत नाही.
नियतीने आपल्यापुढे काय मांडून ठेवले आहे ते आपण
सांगू शकत नाही.
जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा काही ना काही अपेक्षा, आकांक्षा ठेऊनच मार्गक्रमण करत असतो.
स्वतःची ध्येयं पूर्ण करण्याकरिता नवनवे मनसुबे रचत असतो आणि त्या दिशेने वाटचाल करत असतो. कधी कधी वेगळ्या वाटेने पुढे जायचे धाडसही माणूस दाखवतो. अशावेळेस त्याच्या जिवाभावाचे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, तर काही आप्तजन त्याला माग खेचण्यास जीवाचे रान करतात. अशा दोन
टोकाच्या परिस्थितीला माणसाला सामोरे जावे लागते.
एवढा आटापिटा केल्यानंतर माणसाला कधी यश मिळते
तर कधी अपयशाला सामोरे जावे लागते. पण म्हणून लगेच हार मानायची नसते. हा मांडलेला डाव अर्धवट न सोडता माणसाने धैर्याने त्या परिस्थीतीचा सामना करून पुन्हा जोमाने आपले ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
पती-पत्नी लग्न बंधनात बांधले गेले की संसार सुरळीत सुरू झाला तरी पुढे त्यांना अनेक अडथळ्यांना पार करावे लागते. एकमेकांची मने सांभाळावी लागतात. नात्यांना जपावे लागते. तेव्हा कुठे अडीअडचणींत सगे-सोयरे धावून येतात.
जीवन हे अशाश्वत आहे, आज आपण आहोत, उद्याचे काहीच सांगता येणार नाही. कोणीही अमृत प्राशन करून जन्माला आलेला नाही, अमर नाही. त्यामुळे सर्वांशी एकोप्याने राहावे, सचोटीने वागावे, सुख-दुःखात आपल्या जवळच्यांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तर तेही आपल्याला साथ देतील.
'मला ते जमणार नाही, कसे करू!, येत नाही...' असे न म्हणता वेगवेगळे अनुभव घ्यावे, मेहनत करावी आणि विस्कटलेली घडी नीट बसवण्याचा प्रयत्न करावा. यशापयशाने खचून न जाता मिळालेल्या आनंदाचा उपभोग घ्यावा. न जाणो उद्याचा दिवस हा आपलाच असेल आणि सुखाचे क्षण आपल्याला गवसतील. म्हणून 'असले जरी डाव हे घडीचे, प्रयत्न करा हो सच्चे, अन् सार्थक करा जीवनाचे.'
सौ. राजश्री सुहास जाधव.

खुप छान लिहीलयस 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
ReplyDeleteगणेश दळवी 🙏🏼🙏🏼
Dhanyvad sir 🙏
Deleteछान लिहिलंय अप्रतिम 👌👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद मॅडम 🙏
Deleteसुंदर लेखन, सुंदर स्पष्टीकरण...!👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर व सुरेख वर्णन केलत....👌👌💐💐💐
ReplyDeleteप्रेम कवी..🙏🙏🙏