Thursday, 28 April 2022

माझ्यातील मी

बऱ्याचदा माझ्याच मी ला शोधत असते 
नित्य ह्या मनाच्या लपाछपीत हरवून जाते
भासते कधी अंतर्मुख तरी कधी निर्विकार, 
कशी आहे मी ? माझेच मला न गवसते .....

कधी होऊनी जाते खूपच चंचल, 
उमटती मनात भावना त्या तरल 
कधी होऊनी जाते खूपच संयमी, 
अन् आखते धोरण साचेबद्ध जीवनी.....

खरेच माझ्यातील मीस पाहायचे आहे शोधून!
अहंकार, दुजाभाव, कपट अन्  लोभासी त्याज्य करून 
जमेल का मला ह्या साऱ्यांना वगळून?,
महत प्रयासाने होईल साध्य, सांगते मी मनास बजावून....

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

1 comment:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...