माणसाचे मन म्हणजे रहस्यमय जीवन
किती अन् काय काय दडले आहे त्यात!
नेहमीच प्रश्न पडतो मज गहन,
जाता उलगडण्यास ते गुंतून जाई आपणच त्यात ....
रहस्य असतात मनातील खूपच गूढ अन् अनाकलनीय
अंदाज बांधणे ठरते नेहमीच अविश्वसनीय,
खूप काही विचित्र अन् तितकेच अद्भुत
लागत नाही ठाव कदापि त्याचा असतात ती अतुलनीय ...
रहस्यमयी मनावर असते घातलेले गारुढ विचारांचे,
कधी असतात विचार ते मवाळ तर कधी प्रखर,
तर कधी असतात ते सोज्वळ तर कधी घातकी,
लागत नाही कधीच थागं त्याचा,
दडलेली असतात रहस्य ती खोलवर ....
घ्यावयाचे असेल जर रहस्य दुसऱ्याचे जाणून,
तर करावा लागेल विश्वास संपादन
देऊनी त्यास दुजोरा, करावे लागेल समर्थन
जिंकले जर प्रेमाने तरच रहस्याचे होईल निवारण .....
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूपच छान 👌
ReplyDeleteविवेचन रचना सुंदर शब्दांत व्यक्त केलंय 👌
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
आबा
🙏
अप्रतिम रचनाविष्कार!✍️👌👌👌
ReplyDelete