गझल ,वृत्त :- आनंदकंद
डोळ्यांत आज त्याच्या अंगार फार आता
हृदयात भावनांचा भलताच भार आता ....
प्रेमास तो भुकेला व्याकूळ रे किती हा
सोडून संयमाला केलेस पार आता ....
क्रोधात जाळतोया जीवास तू सदा रे
जाणीव यातनांची केलीस गार आता ....
भाषेत गोडवा तो नाहीच रे कधीही
बोलून ते विखारी करतोस वार आता ....
विसरू नकोस वेड्या माणूसकी जरा ही
घे ना तुझ्या मनाशी जोडून तार आता ....
सोसून डंख सारे लढशील तू नव्याने
गवसेल जीवनाचे परतून सार आता .....
येतील पाखरे ती फांदीवरी बसाया
लावू नको कधीही हृदयास दार आता ....
सौ. राजश्री सुहास जाधव.
सुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteक्या बात हैं...👌👌
ReplyDelete