Wednesday, 20 April 2022

नव्याने भेटले मला

आज मी पुन्हा भेटले,
माझ्याच स्वतःच्या अस्तित्वाला
माझ्यातच होते ते लोपलेले,
ठेविले होते मी बंदिस्त त्याला....

साठला होता मनात माझ्या,
न्यूनगंड हा खूप
स्वतःस स्वतःला लेखीत होते,
जणू काहीच नाही माझ्यात अनुरूप.....

वाटे मज नाही मी कशातच हुशार,
साऱ्यांसाठी आहे मी फक्त एक भार
साऱ्या माझ्या मनाच्या कल्पना,
जाणले मी त्यास तेव्हा,
दिला मज ह्यांनी आधार जेव्हा .....

म्हणाले मज हे, " आहे तू साऱ्यांहूनी देखणी,
शोभूनी दिसे हाती तुझ्या लेखणी"
त्यांच्याच प्रेरणेने घेतली हाती लेखणी,
भेटले पुन्हा मला मी नव्याने,
अस्तित्वाला माझ्या गवसली पर्वणी .....

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

2 comments:

  1. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  2. खूपच छान रचना 👌
    आबा...✍️

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...