Tuesday, 12 April 2022

ती कळी...

 


मोजताना फुले बागेतली

एक कळी खुदकन हसली

देखुनी त्या कळीस,
मनात अलवार भावना जागली

मोहक तिचे रूप ,
साठवले मी डोळ्यांत
केव्हा खुलेल कळी ती फुलात ?
उमटले सहज भाव ते अंतरंगात ....

दडली होती जरी ती पानाआड 
न होऊ दिले तिस मी नजरेआड
आला हळुवार एक कवडसा किरणाचा
स्पर्शून त्या कळीस, केले प्रेम जीवापाड
अन् झाले कळीचे फूल क्षणात
पाहुनी त्या आविष्कारासी,
भिणला आनंद रोमारोमात ....

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सौ. राजश्री सुहास जाधव.


2 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...