Monday, 11 April 2022

सोबती

प्रेम असो वा मैत्री 
असावी तिथे खात्री 
जीवनाच्या  वाटेवरी, 
असावा सोबती
जो निभावेल खरी मैत्री ....

खऱ्या मैत्रीत नसावा दुस्वास 
ठेवावा परस्परांवरी विश्वास 
प्रेम वा मैत्रीचा हा सहवास
जोडुनी ठेवितो हृदयास ....

कितीही घ्या प्रेमाच्या आणाभाका !
कितीही व्हा मैत्रीत व्यक्त !
नसेल जर त्यात आत्मीयता,
कदापि ठरत नाही, नाते ते सशक्त ....

असते गरज साऱ्यांनाच सोबतीची
जी काढते भरून उणीव आयुष्याची 
सहवासात तिच्या नसते जाणीव दुःखाची 
असते गरज फक्त एकमेकांस समजून घेण्याची ...

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सौ. राजश्री सुहास जाधव.

1 comment:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...