Thursday, 21 April 2022

जाणीव सत्याची

सत्य हेच आहे, 
कोणाला कोणाचे, 
नसते काहीच देणे घेणे
आवडते साऱ्यांनाच इथे
स्वतःचा उदो उदो करणे....

जाणत नाही सत्य ते 
काय सांगावे !
आज आहे जीवन
तर उदया असेल मरण....

मोह मायेच्या जंजाळात 
अडकतो माणूस,
तुझे माझे करता करता
जातो जीव हकनाक,
करत नाही कोणीही साधी विचारपूस ....

धरशील जर सदैव सत्याची कास,
मिळेल माणसा, यश तुजला हमखास
कर दुजांच्याही भावनांची कदर, 
आहे जोवरी श्वासात तुझ्या श्वास ......

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

1 comment:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...