Friday, 1 April 2022

ध्येयासक्त..

आता कुठे उमजत आहे 
मळभ मनातील सरत आहे 
काळोखास भेदून 
आशेचा किरण डोकावत आहे
नवपालवी मनास या फुटत आहे
संस्काराचे बीज मनी रुजत आहे 
ध्येयासक्त होऊन मी ,
उमेद मनात जागवत आहे 
खूप काही करायचे आहे 
हे मनावर माझ्या बिंबवित आहे 
त्याच दिशेने पाऊल माझे पडत आहे 
जणू  आभाळच  सारे कवेत माझ्या ! 
हीच जाणीव मनास माझ्या सुखावत आहे 
ध्येयवेडी मी, माझ्या काव्यातून सारे मांडत आहे .....🌟🌟

सौ. राजश्री सुहास जाधव.

1 comment:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...