आनंद कंद वृत्त , मात्रा : २४
खोटीच आसवे ती, डोळ्यांत आज आहे
लोभास भाळुनी का विकलीस लाज आहे ....
न्याराच डौल त्याचा, लोकांस दावताना
धुंदीत चेवलेला मदमस्त माज आहे ....
आगीत तेल ओती, कपटीच जात त्याची
अंगात माणसाच्या भिणलीच खाज आहे ....
वाणीत गोडवा तो, पेराल साखरेचा
बेरंग जीवनाचा रे तोच साज आहे ....
हरवून काय जातो, इतक्यात तूच वेड्या
हासून दावलेल्या दुःखात राज आहे ....
सौ. राजश्री सुहास जाधव.
सुंदर गझल👌👌
ReplyDeleteगझल रचना सुंदर 👌👌👌
ReplyDeleteव्वा खूप छान
ReplyDeleteखूपचं छान शब्द रचना...👍👌✍️🍫🍧
ReplyDelete