Thursday, 28 April 2022

गझल १७, लेक

आनंदकंद वृत्त :- मात्रा २४

का भेद हा मुलीने झेलायचा कळेना 
इथल्या समानतेशी संबंधही जुळेना ...

जन्मास लेक आली हा काय दोष माथी 
का भोग हे तिच्या रे नशिबी कसे टळेना ...

ध्येयास पंख द्यावे देऊन तिस दुजोरा 
का भाव मानवाच्या हृदयात तो रुळेना ...

गोठून आज गेल्या  साऱ्याच वेदना त्या 
डोळ्यांत आसवांची का धार ही गळेना ...

जखडून बंधनाची का घालतात बेडी 
का बेगड्या रिती या जळताच रे जळेना ...

सौ. राजश्री सुहास जाधव.

2 comments:

  1. ह्याच रूढीं ना छेद द्यायचा आहे. समाज मन आणि मत बदलायला सिद्ध व्हा.

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...