पहाटे पहाटे जर आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर
आपल्या कानावर निरनिराळे स्वर पडतात. पक्ष्यांचा
तो सुंदरसा किलबिलाट, कोकिळेचे मंजुळ स्वर ऐकून
मनाला खूप प्रसन्नता लाभते आणि असे वाटते की ह्या निसर्गाच्या सान्निध्यातच दिवसरात्र राहवे. नीट कान देऊन
ऐकले की त्या नीरव शांततेत येणारे अगदी कोणतेही आवाज मग ते माणसांचे असो, स्त्रियांच्या बांगड्यांचा किणकिणण्याचा आवाज असो किंवा सकाळी सकाळी चहापानासाठी तयारी करताना होणारा तो कपबश्यांचा आवाज, प्राणी - पक्ष्यांचे विविध आवाज, अगदी निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे ज्यास अस्तित्व आहे, वर्दळीचे,
नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहाचे, सकाळी सकाळी भक्तीत लीन होऊन गाणाऱ्या भक्ताचा स्वर हे प्रातःकाळी कानावर पडले की ते ऐकण्यास मधुरच वाटतात. फक्त त्यासाठी तशी दृष्टी असावी लागते आणि कान , डोळे हे
सजग असले पाहिजे. हे सारे स्वर हे अमृतासमान गोड भासतात.
त्याप्रमाणेच जे थोर संत होऊन गेले त्यांची संतवाणीही,अभंगवाणी अमृताहूनही अवीट आहे. कितीदा ती ऐकली तरी मन भरत नाही. त्यातून जीवनाचे
सार आपल्याला प्राप्त होते. पाप आणि पुण्यातील फरक
लक्षात येतो. आत्मचिंतन , परोपकार , निखळ आनंद, सेवाभाव, सहिष्णूता , आत्म्सुख नेमके कशात आहे , या
साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या वाणीतूनच आपल्यापर्यंत
सहज पोचतात. तो स्वर जाणण्यासाठी तसे हृदय माणसाने तयार करणे गरजेचे आहे .
स्वर मग तो कोणताही असो जो मनापासून उच्चारला तर तो गोड होऊन जातो. जसे की नुकत्याच जन्म घेतलेल्या बाळाचा रडका स्वरही मातेस अमृतासमान गोड वाटतो.
सौ. राजश्री सुहास जाधव.
सुंदर लेखन ✍️👌👌👌
ReplyDeleteखुप सुंदर लेख 👌👌✍️✍️
ReplyDelete