आपल्या मनातील भावना आहे. एखादी विशिष्ट घटना उदाहरण सांगायचे झाले तर एखादा अपघात पाहिला, किंवा भांडण पाहिले, एखाद्या वस्तू विषयी अशा बऱ्याच
गोष्टी असतात ज्या आपण अनुभवल्या , पाहिल्या तर
माणसाच्या मनात एक अनामिक भीती निर्माण होते.
आपल्याला काही इजा तर होणार नाही ना अशी धास्ती मनात असते.
लहान मुलांशी अगदी मोठ्याने बोलले, रागावले
तर त्याला समोरील व्यक्तीची भीती वाटते. ते मूल मग त्या व्यक्ती जवळही जात नाही. त्याच्या मनात त्याच्या विषयी
ती भावना अगदी तीव्र होते.
शाळेत असताना आपल्याला शिक्षकांची भीती
वाटते. ती ही दोन प्रकारची असते, एक तर शिक्षक आपल्याला आपण केलेल्या चुकांबद्दल शिक्षा तर करणार नाही ना, किंवा काही शिक्षक हे खूप शिस्तप्रिय असले तरी ते अतिशय मनमिळाऊ असतात तेव्हा आपल्याला
त्यांच्या विषयी आदरयुक्त भीती वाटत असते.
विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटत असते,
आसपास घडत असणाऱ्या घटनांमुळे स्त्रीला समाजात
स्वतंत्रपणे वावरण्याची भीती वाटत असते, नव विवाहितेला तिच्या सासरची माणसे कशी असतील? तिचा संसार सुरळीत होईल का? अशी भीती सतत वाटत असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या भीतीने माणूस ग्रासलेला असतो.
पण कधी कधी माणसाला विनाकारणच भीती वाटत असते. कुठल्याही गोष्टीविषयी तो सतत विचार करत राहतो ,त्याचे पर्यवसान भीतीत निर्माण होते. माणूस अतिविचाराने , मानसिक त्रासाने खचून जातो. तो नैराश्याने ग्रासतो, म्हणजेच डिप्रेशन मध्ये जातो. त्यातून
जर तो बाहेर आला नाही तर त्याचे गंभीर परिणाम त्याला
त्याच्या जवळील व्यक्तींना भोगावे लागतात. याकरिता त्याला खरे तर समजून घेण्याची, मानसोपचार तज्ज्ञांची
गरज असते. ती त्याला वेळीच मिळणे खूप आवश्यक
असते. त्याच्यातील अस्वस्थतेचे ,anxiety चे कारण शोध ले गेले पाहिजे. तेव्हा कुठे या भीतीतून माणूस बाहेर पडू शकतो.
एकूण काय भीती जरी वाटली तरी त्यातून बाहेर कसे पडता येईल , त्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजे. नुसतेच मला भीती वाटते, आता काय करू? असे म्हणून काहीच उपयोग होत नाही. त्या गोष्टीकडे ही
सकारात्मक रित्या पाहिले तर नक्कीच मार्ग निघू शकतो,
हे कायम माणसाने लक्षात ठेवले पाहिजे.
म्हणून भीती घालवायची असेल तर तिला सामोरे जा म्हणजे आपोआप मनातील भीती कमी होईल.
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूप छान 👌👌👌
ReplyDelete