मनातील डायरीचे पान 🌿🌿: पुरुषांचे वर्चस्व आणि स्त्री
कितीही होऊ दे समाजात परिवर्तन,
तरीही खरेच मिळते का स्त्रीस समर्थन?
शिकून सवरून होऊ दे कितीही मोठी,
थोपवले जाते जबाबदारीचे ओझे तिच्याच पाठी.....
वर्चस्व असते कायम पुरुषांचेच समाजात,
असाच तर पडलाय खरा प्रघात
स्त्रीला दिले जाते नावापुरते वरचे स्थान,
केले जातात वारंवार तिच्यावरी आघात.....
नाही म्हणत सगळेच पुरुष असतात तसे,
पण तरीही स्त्री समाजात दुय्यमच असे
महत्वाचे निर्णय घेणे, हे जणू पुरुषांचे काम
स्त्रीच्या पाचवीला मात्र पुजलेले असते घरकाम.....
कोणी ठेवा अगर नका ठेऊ विश्वास,
हेच खरे आहे अविश्वसनीय सत्य
दिले असले समाजाने स्त्रीस हक्क,
तरीही पुरुषाच्याच हाती असते घराचे सारथ्य .....
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूप छान 👌🏻👌🏻
ReplyDeleteसुंदर, वैचारिक मंथन करणारे काव्य!✍️👌👌👌
ReplyDelete