अविश्वसनीय सत्य हेच आहे,
स्वतःवरील प्रेमात नेहमीच
असतो माणूस मग्न,
देतो तो आधी स्वतःस प्राधान्य,
स्वतःपुढे इतर, त्याच्या तुलनेत नगण्य.....
माझे, मला ,मी , माझ्याकरिता,
ह्यातच गुरफटलेला असतो माणूस
स्वतःचाच अहंभाव मिरवताना
घेत नाही जाणून, कोणाच्याच भावनांचा मागमूस ....
करतही नाही स्वीकार तो सत्य,
असले कितीही जरी त्यात तथ्य
यावे मीपणातून बाहेर आपण,
अन् जगावे दुजांकरिताही
वाटत नाही मनास त्याच्या,
कितीही बजावले जरी त्यास नित्य.....
घेत नाही ध्यानात कधीच,
मृत्यू हेच सत्य अंतिम
देऊ पाहतो हुलकावणी त्यास,
झटत असतो जगण्याकरिताच रात्रंदिन .....
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
सौ. राजश्री सुहास जाधव.
खुपच सुंदर
ReplyDeleteजीवनाचे शाश्वत सत्य सांगणारे काव्य...!✍️👌
ReplyDeleteजय श्री शंभो 🌹🙏
खूपच छान
ReplyDelete👌👍
ReplyDelete