अंधाराची भीती वाटत नाही मला,
जितकी माणसांची भीती वाटे मनाला
अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाट असते सुकर,
पण कसे घालवावे माणसाच्या मनातील अंधाराला ?....
मिणमिणता दिवा नष्ट करी त्या तमाला,
हलकासा कवडसाही खूप असतो अंधाराला
माणसाच्या अंगात भिणलेल्या अंधाराला,
उच्चाटन्यास लावावे लागतात प्राण पणाला ....
न धरावी कदापि अंधाराची भीती
त्याच्यामुळेच तर जाणती सारे,
काय असते प्रकाशाची महती !
असते ती तर खरी, सुख-दुःखाची युती ....
सौ. राजश्री सुहास जाधव.
No comments:
Post a Comment