Wednesday, 8 December 2021

ती पाऊलवाट



असावी ती पाऊलवाट ओळखीची
नसेल मग भीती कशाची
होईल वाट सुखकर जीवनाची
परी ह्यात नसे खरी गंमत चालण्याची
असावी वाट नागमोडी वळणाची
तरच उमगेल खरी गंमत जीवनाची
काट्या - कुट्यांनी भरलेल्या
वाटेने चालताना उमजून जाईल
कला आपसूक तोल सावरण्याची
परीक्षाच जणू आपल्या संयमाची
झालो पास जर ,
पादाक्रांत करू शिखरे यशाची
म्हणून वाट ओळखीची असो,
वा नागमोडी वळणाची असो,
ठेवा तयारी सदैव चालण्याची ......

सौ. राजश्री सुहास जाधव.


5 comments:

  1. सकारात्मक व प्रेरक विचारधारा!👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदर कविता👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर 👌👌👌👌💐💐💐

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना आणि अप्रतिम संदेश दिला

    ReplyDelete
  5. अतिशय सुंदर व सुरेख रचना केलीत...

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...