जीवन हा एक खेळ आहे.
नात्यांची सारी भेळ आहे.
साधावयाचा आपणास मेळ आहे.
विधात्याने रचलेला नियम आहे .
जो येई जन्मास, त्याचा मृत्यू ठाम आहे.
मनमुराद जीवन जगणे, हे आपुले काम आहे .
हरणे, जिंकणे हे निरंतर आहे .
एकास हार, एकास जिंकावे लागणार आहे.
कस खिलाडू वृत्तीचा लागणार आहे .
हारूनही तोच जिंकणार आहे .
अपयशातूनच यशाचा धडा मिळणार आहे .
म्हणून हा जगण्याचा नियम मी पाळणार आहे .....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. राजश्री सुहास जाधव.
खूप छान राजश्री...
ReplyDeleteआयुष्य एक कोडं आहे.....
सोडवाल तितकं थोडं आहे.....
म्हणुन म्हणतेय आयुष्यात....
येऊन माणसं मिळवावी.....
एकमेकांची सुख दु:खे.......
एकमेकांना कळवावी......
खुप छान 👌👌👌
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना
ReplyDelete