ठिणगी एक द्वेषाची
होई धूळधाण आयुष्याची
असते इतुकीशी ही ठिणगी
परी व्यापते ती बुद्धी अवघी
पुरेशी एक ठिणगी द्वेषाची
जिला नसते दयामाया कोणाची
पेटवूनी रान सारे,
करते फरफट माणसाची
ठिणगीत ताकद अफाट फार
क्षणात करते ती साऱ्यांचा संहार
करुनी कब्जा माणसांवरी
मिरवते स्वतःचीच मक्तेदारी
ठिणगी एक द्वेषाची, रुजते मनामनात
अन् अडकवते माणसाला स्वतःच्याच जंजाळात
करते रागाची आणिक तिरस्काराची बरसात
होरपळून टाकते माणसाला अवघे जीवनात .....
सौ. राजश्री सुहास जाधव.
वाहह.. खुप सुरेख शब्दांकन , वास्तवदर्शी अप्रतीम रचना...👌👍💐🍫
ReplyDeleteखुपच सुंदर रचना 👌👌✍️✍️
ReplyDeleteव्वा् ताई अप्रतिम रचना
ReplyDeleteव्वा ताई अप्रतिम रचना
ReplyDeleteठिणगीच ती...जीवन उद्धवस्त करते! सुंदर रचना मॅडम ✍️👌👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👍👍
ReplyDelete