असावी ती पाऊलवाट ओळखीची
नसेल मग भीती कशाची
होईल वाट सुखकर जीवनाची
परी ह्यात नसे खरी गंमत चालण्याची
असावी वाट नागमोडी वळणाची
तरच उमगेल खरी गंमत जीवनाची
काट्या - कुट्यांनी भरलेल्या
वाटेने चालताना उमजून जाईल
कला आपसूक तोल सावरण्याची
परीक्षाच जणू आपल्या संयमाची
झालो पास जर ,
पादाक्रांत करू शिखरे यशाची
म्हणून वाट ओळखीची असो,
वा नागमोडी वळणाची असो,
ठेवा तयारी सदैव चालण्याची ......
सौ. राजश्री सुहास जाधव.
सकारात्मक व प्रेरक विचारधारा!👌👌👌
ReplyDeleteसुंदर कविता👌👌
ReplyDeleteअतिशय सुंदर 👌👌👌👌💐💐💐
ReplyDeleteखूप छान लिहिलंय अप्रतिम रचना आणि अप्रतिम संदेश दिला
ReplyDeleteअतिशय सुंदर व सुरेख रचना केलीत...
ReplyDelete