भुजंगप्रयात वृत्त :- लगावली : लगागा लगागा , लगागा लगागा
मात्रा : २०
कितीदा मनाला... तिने थोपवावे
कसे प्रेम त्याच्या... मनी रूजवावे ...
असे मी दिवानी... तुझी प्रेम वेडी
तुला सारखे मी... पुन्हा आठवावे ...
दिले हृदय तुजला... सख्या ते नव्याने
नसे ते बहाणे... तुला ना कळावे ...
मुक्या भावना या... कशा मीच सांगू
मनाने मनाला... सख्या ओळखावे ...
तुझ्या रे सुरांना...असे साथ माझी
तराणे सुरांचे... सख्या आळवावे...
सौ. राजश्री सुहास जाधव. ( काल्पनिक रचना)
गझल मध्येही यशस्वी लिखाण... सुंदर रचना👌👌
ReplyDeleteसुंदर गझल रचना!👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम सुंदर
ReplyDelete