Tuesday, 21 December 2021

उद्वेग



तुझ्या उद्वेगाची कल्पना ही करवत नाही
किती सहन करावे, याला काही अंतच नाही
समदुःखी तू आणि मी, ओझी  आता पेलवत नाही
थकलो आहोत शरीराने अन्  मनानेही,
अवसान आता काहीच उरले नाही

सगळ्यांसाठी सगळं केलं ,
स्वतःस मात्र त्यातून  वगळलं
दिवस रात्र, शरीर हे दुसऱ्यांसाठीच झिजलं
येतील सुखाचे दिवस, असं म्हणत जीवन कंठलं

सरले सारे आयुष्य, परी फुलले ना चेहऱ्यावरी हास्य
घालून समजूत मनाची, नाही केले कदापि त्यावर भाष्य
बजावले मनाला , असेच असेल आपले आयुष्य
का द्यावा दोष कुणाला, घे मानून तू  सुखाला .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


7 comments:

  1. वेदनेला अंत नाही....अन कुणाला खंत नाही....अशी सुरेश भटांच्या रचनेसारखी अवस्था व्यक्त केली आहे... मस्त रचना👌👌

    ReplyDelete
  2. खूपच अप्रतिम रचना राजश्री...👌👍✍️🍫

    ReplyDelete
  3. खूप खूप मस्त रचना अप्रतिम..🌹🌹🌿🌿🌿🌺🌺🌺💗💗💗👌👌👌👌🌿☺️सुंदर अप्रतिम

    ReplyDelete
  4. खूपच सुंदर अप्रतिम लिहले

    ReplyDelete
  5. स्त्री मनाची घालमेल छान तर्‍हेने व्यक्त केलीत

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...