स्त्रिग्विनी वृत्त : मात्रा २० गालगा गालगा गालगा गालगा
बंधने लादता.. वेदना जाळते
का तरी शांत मी ..आसवे गाळते
भोगते भोग हे .. यातना केवढ्या
वार ते झेलता .. शब्द मी पाळते
पारखी आज मी .. सुखसरी वेचण्या
बावरी मी पुन्हा .. तुजवरी भाळते
रात ही हासता .. ओढ ही लागते
केतकी मोगरा .. कुंतली माळते
मोहरावी अशी ...प्रीत ही आपुली
मुक्त रे आज मी.. दुःख हे टाळते
सौ. राजश्री सुहास जाधव.
अप्रतिम रचना 👌👌👌💐💐
ReplyDeleteखूपच सुंदर रचना!✍️👌👌👌
ReplyDeleteउत्कट भावभावनांचं दर्शन... सुंदर रचना👌👌
ReplyDeleteफारच सुंदर ����
ReplyDeleteखुपच सुंदर 👌👌✍️✍️
ReplyDelete