' व्यक्ती तितक्या प्रकृती ' असे म्हणतात ते काही चूक नाही. चार माणसं एकत्र आली की प्रत्येकाचे विचार वेगळे, दृष्टिकोन वेगळा त्यामुळे तिथूनच खरी वादाला
सुरुवात होते आणि मग एकमेकांबद्दल असूया, कटुता
मनात निर्माण होते .
खरे तर आज ह्या मितीस परस्परां बरोबरचा
संवादच खुंटला आहे . प्रत्येक जण स्वतःच्या विश्वात
रमला आहे. सोशल मीडिया, नवनविन फंडे, पैशाचा
हव्यास, प्रसिद्धी या साऱ्यातून एकमेकांना समजून घ्यायला, पुरेसा वेळ द्यायला कोणाकडे वेळच नाही.
तरुणाई त्यांच्या धुंदीत, आई वडील त्यांच्या कामात
व्यस्त असतात. मग संवाद होणे दूरच पण जो काही
वेळ असतो तो वाद विवाद करण्यातच जातो.
काहींना तर क्षुल्लक कारणावरून वाद घालण्याची सवयच असते. पण अशा छोट्या छोट्या वादाला नंतर उग्र स्वरूप प्राप्त होते आणि त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा
लागतो. एकमेकांकडून जास्त अपेक्षा ठेवल्या आणि त्या
पूर्णत्वास आल्या नाही की वादास कारण ठरते. मनात एकमेकांविषयी अढी निर्माण होते. जो तो त्याचेच म्हणणे कसे बरोबर आहे , हेच दाखवण्यात आनंद मानतो. प्रसंगी
आरोप - प्रत्यारोप, अगदी मारामारी पर्यंत प्रकरण जाते.
सर्वत्र नकारात्मकताच दिसून येते.
पती - पत्नीतील वाद, आई वडील आणि मुलांतील वाद, मित्र - मैत्रिनींतील वाद, वरिष्ठ आणि कर्मचाऱ्यांतील वाद, जाती भेदातील वाद, राजकीय वाद असे बऱ्याच
प्रकारचे वाद आपल्या सभोवताली दिसून येतात.
वाद जरी झाले तरी ते सामोपचाराने मिटवता येऊ शकतात. त्याकरिता दोन्ही कडून तशी तयारी दाखवली
पाहिजे. प्रत्येकाच्या विचाराचा आदर हा झालाच पाहिजे .
मग तो आपल्यापेक्षा लहान असला तरी त्याला त्याचा
विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार दिलाच पाहिजे. तरच
असे वाद निर्माण होणार नाही. मनात कटुता भरणार
नाही.
आयुष्य खूप छोटे आहे, ते आनंदाने जगू या. वाद
विवाद टाळून प्रेमाने जीवन जगू या. एकमेकांशी हितगुज
करू या, अहंभाव टाळू या..... 'नको हे वाद, जे करती जीवन बरबाद , त्यापरी घ्या जीवनाचा आस्वाद अन् जगा
मनमुराद ' तुम्हाला काय वाटते !.....
सौ. राजश्री सुहास जाधव.
खरंय...वाद टाळले तर आनंद गवसतो.!👌👌👌
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम
ReplyDeleteखरंय... तुमचं म्हणणं तंतोतंत पटतंय.... छान समुपदेशन👌👌
ReplyDeleteखर आहे खूप छान लेख लिहिला आहे ..नको हे वाद विवाद
ReplyDeleteअतिशय सुंदर रचना 👌👍
ReplyDelete