अबोल तू अबोली
जशी मोहक कुंदकळी !
छळते किती मनास या,
निरव या कातरवेळी
खुलणार कधी सांग सखे
तुझ्या गालावरची खळी ?
पाहुनी तुजला जातो मी हरवून
अबोल तुझे हे मौन जरी,
जाते मजला खूप काही सांगून
शब्दांविना डोळ्यांतून येई सारे उमजून
छेडते हृदयात माझ्या,
अलवार तुझ्या प्रेमाची धून
आहे सखी हीच आपुल्या
निःस्वार्थ प्रेमाची खूण
मग होई बोलके तुझे मौन
मौनात तुझ्या जातो
मी चिंब भिजून अन्
येई प्रीत आपुली बहरून ......
सौ. राजश्री सुहास जाधव.
अप्रतिम...👌👌👌
ReplyDeleteखूप खूप मस्त रचना अप्रतिम..🌺🌺🌹🌹💗🌿🌿🌿❤️
ReplyDeleteसुंदर रचना..👌👍✍️🍫
ReplyDeleteअप्रतिम रचना
ReplyDeleteफारच सुंदर 👌👌
ReplyDelete