या जीवन सागरात खरे तर आपण सारेच नाविक
आहोत. ही जीवन नौका पार करण्यात जो तो त्याच्या त्याच्या परीने प्रयत्न करत असतो. कोणी अतिशय तरबेज
असतो, तर कोणाची दिशा भरकटते , कोणी त्यातून अगदी सहिसलामत बाहेर पडतो.
आपण जर आपल्या आसपासचे किंवा समाजात
घडत असणाऱ्या घटनांचे अवलोकन केले तर आपणास
असे लक्षात येते की, असे एकही ठिकाण नाही जिथे
अफवा नाही. जिथे तिथे आपल्याला धादांत खोटेपणाच
आढळून येईल.
अगदीच सांगायचे झाले तर वर्तमान पत्रात रोज येणाऱ्या बातम्या, जाहिराती ह्या सगळ्याच तंतोतंत खऱ्या असतात का ? हा प्रश्न नेहमी मनाला माझ्या भेडसावत असतो. कधी कधी आपला वाचक वर्ग वाढावा म्हणून त्या बातम्या अगदी तिखट मीठ लावून छापल्या जातात. आपणही मग त्यामध्ये वाहवत जातो. सगळेच असे करतात असेही मी म्हणणार नाही. कारण अजूनही उत्तम असे लेख , माहिती, घडामोडी आपल्याला ह्या माध्यमातूनच मिळत असतात. आपण फक्त शहानिशा
करणे महत्वाचे असते.
टीव्ही वर येणाऱ्या वेगवेगळ्या जाहिराती पाहून आपण त्याला भुलून जातो , जसे की, अमुक हे खा आणि
आठवडाभरात वजन घटवा, चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्यासाठी अमुक अमुक क्रीम लावा . खरोखर हे
कितपत खरे होते. आपण ह्या गोष्टीचा विचार करत नाही
आणि नाना तऱ्हेचे उपाय भरमसाठ पैसे मोजून करतो
पण रिझल्ट्स काही केल्या मिळत नाही.
त्यापेक्षा तुम्ही जे सत्य आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा
नियमित व्यायाम करा, नेहमी हसतमुख राहा, पौष्टिक खा,म्हणजे आपोआप आपल्या सौंदर्यात भर पडेल.
आज सोशल मीडिया मध्ये तर अफवांना उधाण आलेले असते. एकाने एखादी पोस्ट शेअर केली की इतर लोक ही म्हणजे आपण सारेच, कुठलीही सत्यता न पडताळता पुढे तीच पोस्ट फॉरवर्ड करतात. त्यामुळे समाजात चुकीचे संदेश जातात , त्यातून मग विषयाला
वेगळे वळण प्राप्त होऊ शकते, लोकांच्यात मतभेद निर्माण होतात, अराजकता माजते. ह्याला कारण
म्हणजे कोणतीही गोष्ट सोयीस्कररित्या खोटे बोलून लोकांच्या गळी उतरवण्याचे काम ही वेगवेगळी
माध्यमे करत असतात.
आपल्या नाते संबंधातही खूप वेळा असा खोटेपणा
आपल्या दिसून येतो. वर वर आपली आपली म्हणवणारी
बऱ्याच वेळा मनातून आपला द्वेष करणारी असतात. आपल्यावर जळणारी असतात. कधी पलटून वार करतील , हे सांगताच येणार नाही.
ह्या साऱ्यातून निभावयाचे असेल तर , ह्या जीवन
सागरात वावरताना आपण तरबेज असले पाहिजे.
अफवांच्या या पेवात आपल्याला सत्य हे शोधता आले
पाहिजे, तरच आपण खरे ह्यातून तरून जाऊ शकतो.
सौ. राजश्री सुहास जाधव.
खुपच सुंदर अप्रतिम वास्तविक स्थिति आहे.
ReplyDeleteवास्तव मांडले सखी 👍👍👍
ReplyDeleteसत्य असत्य वरील सुंदर विवेचन👌👌
ReplyDeleteछान
ReplyDeleteअप्रतिम 👌👌👌👌🙏🙏
ReplyDeleteसुंदर विवेचन
ReplyDelete