आनंद कंद वृत्त :- मात्रा २४
गागाल गालगागा गागाल गालगागा
बाजार भावनांना, आता विकार झाला
हृदयावरी असा का, ठरवून वार झाला...
डोळ्यांत आसवांचा, हा पूर साठलेला
तो भाव गोठलेला, का आज गार झाला...
तो चंद्र चांदण्यांचा, गेला कुठे कळेना
सोडून चांदण्यांना, तो ही पसार झाला....
संसार हा सुखाचा, खोटाच पाहिला मी
जगण्यास आज माझ्या, त्याच्याच भार झाला....
स्वप्नातला सखा मी, साक्षात पाहिल्यावर
आभास हा मनाचा, डोळ्यात सार झाला
सौ. राजश्री सुहास जाधव.
अप्रतिम गझल ताई
ReplyDeleteसुंदर गझल
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteखूप सुंदर गझल👌👌👌👌
ReplyDeleteछानच रचना 👌🏼👌🏼🌟🌟🌟🌟🌟
ReplyDeleteअतिशय सुंदर गझल ताई
ReplyDelete