Tuesday, 30 November 2021

शब्द ते दाटले



शब्द ते दाटले
डोळे आज पाणावले
भाव अंतरीचे पुन्हा
पेटून उठले
गौण समजून मुलीस
अस्तित्व तिचे नाकारले
घाव होऊनी हृदयी ते डसले
मुलामुलींच्या भेदात सारे फसले
ना भाव कधी तिच्या मनीचे जाणले
घेण्यास उत्तुंग भरारी,
ना पाठबळ कधी तिला मिळाले
शिक्षण घेऊनही अखेरीस,
चूल, मूल आणि संसारातच तिला गुंतवले
काय तर म्हणे !
' हेच आहे संस्कार  आपले '
तेच आम्ही तुला दिले
राख त्याचे भान तू पहिले
ऐकून हे सारे
मन माझे गहिवरले 
शब्द ते  दाटले
डोळे आज पाणावले.......

सौ. राजश्री सुहास जाधव.


11 comments:

  1. खुपच सुंदर रचना ✍️✍️🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. खूप छान सुंदर अप्रतिम रचना

    ReplyDelete
  3. क्या बात है..!
    खरंच वाचताना आमचेही पावले..!
    खूप छान मांडलय 👌
    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    आबा 🙏

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर रचना 👌👌👌👌👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...